मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !


_________________

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल !
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल !

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर
तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल !

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल !

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल !

जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दर्वळेल !

जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल !

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल !
_________________________

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

5 Response to "मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल ! "

  1. Shilpa Chaturvedi says:
    January 7, 2014 at 7:31:00 PM GMT+5:30

    Wow!!! After such a longtime i heard this song once again... I thought it was lost in memories... Thanks Nainita...

  2. Sujata Sarmalker says:
    January 7, 2014 at 7:34:00 PM GMT+5:30

    very nice

  3. Rupali Joshi says:
    January 8, 2014 at 8:19:00 AM GMT+5:30

    Mast, khup chan watle eikun

  4. Pradip Ambike says:
    January 8, 2014 at 9:08:00 AM GMT+5:30

    खुपच छान !

  5. Subhi Abhijeet Dalvi says:
    January 12, 2014 at 4:01:00 PM GMT+5:30

    खूप सुंदर रचना आणि स्वर....पेशकश आणि निवड पण कौतुकास्पद

Post a Comment